सावंतवाडीत अनुभवण्यासारख्या गोष्टी | BizBalloon
×

सावंतवाडीत अनुभवण्यासारख्या गोष्टी

सावंतवाडी तालुक्यात उंच डोंगर, खाडी, तलाव असे निसर्गाशी जोडणारी प्रेक्षणीय स्थळे तसेच जेवणासाठी चांगले पर्याय व प्रसिद्ध कला लाकडी खेळणी  अशा वेगवेगळ्या गोष्टींनी सावंतवाडीला  एक विशिष्ट वेगळेपणा प्राप्त झाला आहे. या वेगळेपणाचा प्रत्यक्ष अनुभव घेताना पुढील महत्वाच्या स्थळांना भेट द्यायला विसरू नका.

लाकडी खेळणी

जर तुम्हाला तुमचं घर सजवायचं असेल, मुलांना खेळण्यांसाठी चांगले पर्याय हवे असतील तर सावंतवाडीत  तुम्हाला खूप पर्याय मिळू शकतात. सावंतवाडी हे भारतातील लाकडी खेळणी व कला कुसरीच्या वस्तू बनवणे या कालेसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. येथील कारागीर जे मुख्यत्त्वे चितारी समाजाचे आहेत ते आपल्या उत्कृष्ट कल्पना शक्ती चा वापर करून लाकडी फळे, घरगुती वापराच्या वस्तू व खेळणी बनवतात. बऱ्याच फळांच्या लाकडी हुबेहूब प्रतिमा, वेगवेगळ्या गाड्यांच्या प्रतिमा, फळांचा ट्रे, कंदील, लहान मुलांसाठी शैक्षणिक खेळणी अश्या  विविध संकल्पनेनवर आधारित कॅफ्ट्स व खेळणी बनवली जातात.

754190241445230

भालेकर फूड

जर तुम्ही सावंतवाडी मधून जात असाल आणि नॉन व्हेज लव्हर असाल खास करून सी फूड, तर तुमच्या साठी उत्कृष्ट पर्याय म्हणजे भालेकर यांची महालक्ष्मी खानावळ. येथे मालवणी घरगुती पद्धतीने सर्व डिशेस बनविल्या जातात आणि त्यामुळेच येथे नेहमी गर्दी असते. वीक एन्ड ला तर गर्दीमुळे बऱ्याच वेळा ग्राहकांना वाट पाहावी लागते. फिश थाळी मध्ये तळलेला फिश, फिश करी, चपाती, भात, सोलकढी, कोशिंबीर यांचा समावेश असतो. खेकडा, तिसरे, कोळंबी, मोरी असे विविध पर्याय सी फूड मध्ये येथे उपलब्ध असतात. चिकन व बकरा मटण थाळी सुद्धा मिळते. चवी मधील सातत्यता हे यांचे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे.  

 

साधले फूड

जर शुद्ध शाकाहारी जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर साधले मेस तुमच्यासाठी खूप चांगला पर्याय आहे. येथे घरगुती मालवणी पद्धतीचे जेवण बनवले जाते. सकाळी ७ ते १०:३० पर्यंत नाष्टा सुद्धा मिळेल. दुपारी १२ ते साधारण ३:३० व रात्री ७:३० ते १० पर्यंत या जेवण मिळत.  जेवणाची वेळ  नाष्ट्या मध्ये पोहे, उपमा, इडली, आंबोळी-चटणी, नाचणी किंवा तांदूळ घावणे, थालीपीठ, पुरीभाजी, खिचडी, असे विविध पर्याय आहेत. थाळीमध्ये आमटी, भाजी, उसळ, चपाती, भात, ताक व कोशिंबीर यांचा समावेश असतो. स्वछता व चवीचं सातत्य असल्यामुळे हा शाकाहारी लोकांसाठी एक उत्कृष्ट पर्याय बनला आहे.

आंबोली हिल्स

सह्याद्रीच्या कुशीतील आंबोली हे एक जागतिक “इको-हॉट-स्पॉट” आहे. अतिशय उंच कड्यांवरून होणार सूर्यास्त दर्शन, पावसात वाहणारे धबधबे, पांढरंशुभ्र धुकं, खोल दऱ्या अश्या बऱ्याच गोष्टी पर्यटकांना आंबोलीत आकर्षित करतात. आंबोली हे सिंधुदुर्गातील उंच ठिकाणां पैकी  एक ठिकाण असून येथे पावसाचे प्रमाण जास्त आहे. आंबोलीत सर्वाधिक गर्दी असते ती पावसाळ्यात आणि तीच मुख्य कारण  म्हणजे उंच काड्यांवरून कोसळणारे धबधबे. पावसाळ्यात हजारोच्या संख्येने पर्यटक प्रत्येक दिवशी या धबधब्याखाली अंघोळ करतात. कावळेसाद येथील दरीत कोसळणारे पाणी बघण्यासाठी सुद्धा पर्यटक गर्दी करतात. मुख्य शहरापासून ४ किलोमीटर वर प्रसिद्ध  हिरण्यकेशी शिवाचे मंदिर आहे. हिरण्यकेशी हा भाग लोक वस्तीपासून दूर व उंच असल्यामुळे येथील शांतता नक्कीच अनूभवण्यासारखी आहे. जर तुम्हाला प्रदूषण मुक्त वातावरणात वेळ घालवायचा असेल तर आंबोली हा सावंतवाडीतील एक चांगला पर्याय आहे.

मोती तलाव - गार्डन फेरफटका

शहराच्या मधोमध असलेल्या  मोती तलावामुळे सावंतवाडी शहराला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालय. मोती तलाव आणि त्याच्या आजूबाजूचा परिसराची सुंदररता अनुभवणं हा एक अप्रतिम अनुभव आहे सायंकाळच वातावरण तर अगदी विलोभनीय असत. अनेक लोक आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून मोतीतलावाला फेरफटका मारण्यासाठी येतात. लोकांसाठी चर्चा करण्यासाठी हे खूप चांगले स्थान आहे. तळ्याला लागूनच जनरल जगन्नाथराव भोसले गार्डन आहे. जर तुम्ही परिवारा बरोबर असाल तर गार्डन मध्ये सुद्धा काही वेळ घालवू शकता. सभोवताली आईस-क्रीम ची दुकान, स्नॅकसाठी हॉटेल्स किंवा चॅट सेंटर आहेत.

ऐतिहासिक राजवाडा

 

मोती तलावाला लागूनच ऐतिहासिक राजवाडा आहे. १७५५ ते १८०३ च्या दरम्यान राजे खेम सावंत ३ यांनी हा रजवाडा बांधला. तुम्हाला ऐतिहासिक गोष्टींबद्दल कुतूहल असेल किंवा संस्थान कालीन भारतातील प्रशासन व्यवस्था कशी चालायची हे बघायचं आहेत तर हे एक चांगले ठिकाण आहे. प्राचीन शिल्पे, बैठक व्यवस्था आणि कला कुसरीच्या वस्तुंनी राजवाडा सजवलेला आहे. राजवाड्यात प्रवेश करण्यासाठी नॉमिनल शुल्क घेतले जाते.

Add comment