कुडाळ मध्ये अनुभवण्यासारख्या गोष्टी | BizBalloon
×

कुडाळ मध्ये अनुभवण्यासारख्या गोष्टी

कुडाळ हे सिंधुदुर्गातील मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे व्यावसायिक दृष्टीने ते फार महत्वाचे आहे. तस असलं तरीही अनुभव घेण्यासारख्या काही  गोष्टी आहेत ज्या तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव देतील.  


 

मच्छिन्द्रनाथ तपोभूमी देवाचा डोंगर आंबडपाल:

नवनाथ कथासागरात कुडाळच्या ज्या क्षेत्राचा उल्लेख आहे व ज्याची भौगोलिक रचना अतिशय नयनरम्य व अद्भुत आहे ते हे ठिकाण. सखोल अध्यात्मिक शांतता या  ठिकाणी तुम्ही अनुभवू शकता. सभोवतालच्या परिसरापेक्षा हा भाग उंच आहे त्यामुळे बऱ्याच दूर पर्यंत चारही बाजुंचा परिसर दिसतो.


 

श्री कलेश्वर मंदिर नेरूरपार कुडाळ:

कलेश्वर हे एक जागृत देवस्थान असून साधारण १२ व्या शतकात याची स्थापना झाली असावी. कलेश्वर म्हणजेच काळोबा हे नेरूर चे ग्राम दैवत होय. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे अप्रतिम कोरीव काम केलेले खांब. श्री ब्राम्ह्मनाद मंदिर(ब्रम्ह देवाचे मंदिर जगात काही मोजकीच ब्रह्मदेवाची मंदिर आहेत त्यामुळे सुद्धा या परिसराला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालंय.) , श्री देव रवळनाथ, श्री देव भूतनाथ, श्री देव पूर्वस, श्री देव जैन ब्राह्मण मंदिर, श्री देवी सातेरी मंदिर, श्री देव गावडोबा, श्री देवी नितकारी मंदिर, श्री शिवदेवी मंदिर अशी मंदिरे आहेत. मंदिराच्या बाजूला कलेश्वर तलाव आणि चहू बाजूनी डोंगर आहेत. कुडाळ-मालवण रोड ने तुम्ही प्रवास करत असाल तर कुडाळ पासून साधारण ७ कीलोमीटर वर हे मंदिर आहे.


 

बेलवलकर फूड्स:

कुडाळ मध्ये तुम्हाला अस्सल मालवणी सी-फूड चा आस्वाद घ्यायचा असेल तर बेलवलकर फूड्स हा तुमच्या साठी चांगला पर्याय आहे. येथे सर्व प्रकारचं नॉनव्हेज फूड मालवणी पद्धतीने बनविले जाते. ज्यांना सी-फूड आवडत अश्या खवय्यांनी येथे नक्कीच भेट द्यावी.

 

ड्रीमलँड गार्डन:

आवर्जून भेट देण्यासारख हे  एक उत्कृष्ट ठिकाण आहे. येथे करण्यासाठी खूप काही आहे. जॉगिंग ट्रॅक, बोटिंग, गार्डन रेस्टॉरंट, मँगो फार्म, पिकनिक स्पॉट, कॅम्पफायर (शेकोटी) अशा अनेक सुविधांनी सुसज्ज अशी गार्डन आहे. अनेक सोई-सुविधा एकाच छताखाली, परिसरातील स्वछता व  सुंदर गार्डन तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव देईल.

Add comment